उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या सभांनी चांगलीच रंगत भरली आहे. समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी प्रचाराची धुरा सांभळली आहे, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीसुद्धा पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

लखनौ, उत्तर प्रदेश  - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज (सोमवारी) होत आहे. या पचव्या टप्प्यात ११ जिल्ह्यांतील ५२ मतदारसंघांचा समावेश आहे. 

उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यांत मतदान होत आहे. सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान झाले होते. दुसरा टप्पा १५ फेब्रुवारीला पार पडला. या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले, तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १९ फेब्रुवारीला झाले. या वेळी ६२ टक्के मतदान झाले. चौथा टप्पा २३ फेब्रुवारीला पार पडला. या वेळी ६१ टक्के मतदान झाले. आता पाचव्या टप्प्यात बलरामपूर, गोंडा, फैजाबाद, आंबेडकरनगर, बहरीच, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीरनगर, अमेठी आणि सुलतानपूर या अकरा जिल्ह्यांतील ५२ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. 

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या सभांनी चांगलीच रंगत भरली आहे. समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी प्रचाराची धुरा सांभळली आहे, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीसुद्धा पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यात मतदार कोणाला कौल देतात हे निकालानंतरच कळेल. 

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

रविवार, 20 ऑगस्ट 2017