उत्तर प्रदेशात सप-काँग्रेसला नाकारले : योगी आदित्यनाथ

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

लखनौ - ''भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेल्या रणनितीनुसार उत्तर प्रदेशात प्रचार केला, त्याचे हे यश आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांनी आघाडीला पूर्णपणे नाकारले असून, नागरिकांना सुरक्षा आणि विकास पाहिजे,'' असे मत भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.

प्रचंड बहुमताच्या आधारावर सरकार स्थापन करणार
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी देशाच्या हितासाठी नव्हती, असेही आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात भाजपने 200 चा आकडा पार केला असून, बहुमताजवळ पोहचले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला मोठे अपयश आले असून, बहुजन समाज पक्ष (बसप) ही करिष्मा दाखवू शकली नाही.

मोदींमुळे भाजपचा विजय : केशव प्रसाद मौर्य
उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशाचे पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, त्यांच्यामुळेच भाजपला यश मिळाले. कार्यकर्त्यांनी मी विजयाबद्दल अभिनंदन देतो, असे उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.