‘निवडणुकांमुळेच नोटा बंदचा निर्णय’

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

लखनौ - काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालणे हा त्यावरील कायमचा उपाय नाही, असे सांगून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा निर्णय आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने घाईगडबडीने घेतला असल्याची टीका बुधवारी केली.

हा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी संसदेत या विषयावर चर्चा करायला हवी होती. आम्हीही काळ्या पैशाच्या विरोधात आहोत. पण पाचशे-हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करणे हा त्यावरील कायमस्वरूपी उपाय नाही, असे त्यांनी सांगितले.