छत्तीसगडमध्ये रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होणार : अर्थमंत्री

छत्तीसगडमध्ये रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होणार : अर्थमंत्री

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कथगोरापासून दोंगरग्रहपर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. छत्तीसगड सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये करार होणार असून, यासाठी 5,950 कोटी रुपयांचा अंदाजित करार असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) दिली.

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अरुण जेटली यांनी केंद्र सरकारच्या विविध निर्णयाची माहिती दिली. 

अरूण जेटली यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे :

- मागील वर्षी आणि या वर्षी साखर उत्पादनात वाढ झाली आहे. 

- येत्या काही दिवसांत अतिरिक्त साखर देशात एकत्रित होणार आहे. 

- मंत्रिमंडळाने या अतिरिक्त उत्पादनाबाबत मोठे निर्णय घेतले आहेत.

- यासाठी संबंधित मंत्रालयाकडून यावर विचार करण्यात आला आहे.

- साखर कारखान्यांना साखर वाहतुकीची विशेषता निर्यातीसाठी त्यांना सहाय्य केले जाणार आहे.

- अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या नियमांचे पालन करणाऱ्या कारखान्यांसाठी 5, 538 कोटी रूपयांची अंदाजित रक्कम असेल.

- पटनात एक नवीन देशांतर्गत विमानतळाबाबत निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये नव्या संकल्पना असणार आहेत.

- हा नवा प्रकल्प 1 हजार 216.90 कोटी रूपयांच्या अंदाजित रकमेचा असणार आहे, या प्रकल्पाला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

- छत्तीसगडमधील कथगोरापासून दोंगरग्रहपर्यंत छत्तीसगड सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये करार होणार आहे. यासाठी विद्युतीकरणाचे रेल्वे ट्रॅक असणार आहे. 

- छत्तीसगड आणि केद्र सरकारमध्ये 49/51 नुसार करार होणार आहे. या प्रकल्पाचे अंतर 294 किमी. 5950 कोटी रुपयांचा असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com