पुलवामा, कुलगाममध्ये चकमक; दहशतवाद्यांना घेरले

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कुलगाममधील काझीकुंड परिसरातील नवबाग कुंड गावात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या संशयावरुन भारतीय लष्कराने आज सकाळी शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहीम दरम्यानच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 12 तासांपासून चकमक सुरू असून, पाच दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

कुलगाममधील काझीकुंड परिसरातील नवबाग कुंड गावात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या संशयावरुन भारतीय लष्कराने आज सकाळी शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहीम दरम्यानच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. ज्यामुळे ही चकमक घडून आली, अशी माहिती येथील पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

चकमक सुरु असतानाच पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरम परिसरातील त्राल तालुक्यातील लाम गावात दहशतवाद्यांनी पुन्हा शोधमोहीम करणाऱ्या लष्करी जवानांवर गोळीबार सुरु केला. सध्या या दोन्ही जिल्ह्यांत गोळीबार सुरु असून इतर सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नाही. शनिवारपासून श्रीनगर येथील शोपियाँ आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने या शोध मोहिमेला सुरुवात केली होती.