मन की बात पुरे, आता काम की बात करा- अखिलेश

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

मोदी उत्तर प्रदेशमध्ये मतांसाठी फिरत आहेत. त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी काहीच केलेले नाही. सत्तेत आल्यानंतर मोदींनी नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात ते असमर्थ ठरले आहेत.

जौनपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात थांबवून आता काम की बात सुरु करावी, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लगाविला.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराची मुदत आज (सोमवार) संपत आहे. अखिलेश यादव यांच्या आज सात सभा होणार असून, पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, भाजप आणि बहुजन समाज पक्षात लढत आहे.

अखिलेश यादव म्हणाले, की मोदी उत्तर प्रदेशमध्ये मतांसाठी फिरत आहेत. त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी काहीच केलेले नाही. सत्तेत आल्यानंतर मोदींनी नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात ते असमर्थ ठरले आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे मोदी सांगत आहेत. मग, त्यांनी आतापर्यंत त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमधील शेतकऱ्यांची कर्ज का माफ केली नाहीत? आता मोदी परदेशात न जाता येथेच रोड शो करतील, असे वाटते.

Web Title: Enough 'Mann ki baat, do kaam ki baat': Akhilesh tells Modi