'ईपीएफओ'च्या 'कामगार बॅंके'चा प्रस्ताव अमान्य

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) "कामगार बॅंक‘ स्थापनेसाठी दाखल केलेला प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी फेटाळून लावला. ईपीएफओने देशभरात पावणेचार कोटी सदस्यांना सेवा देण्यासाठी "कामगार बॅंक‘ स्थापनेचा प्रस्ताव केंद्र सरकार पुढे ठेवला होता.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 19 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या बैठकीत बॅंक स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी बैठकीत विश्वस्त मंडळाने "बॅंक‘ स्थापनेला अनुकूलता दर्शविली होती. त्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र बॅंकिंग व्यवहार करण्यासाठी आवश्‍यक सक्षमता आणि अनुभव ‘ईपीएफओ‘कडे नसल्याचे कारण देत केंद्राने हा प्रस्ताव नाकारला आहे. सध्या देशात "ईपीएफ‘चा लाभ घेणारे 3.7 कोटी सदस्य आहेत. त्यांचा तब्बल रु. 7.5 लाख कोटींच्या निधीचे "ईपीएफओ‘मार्फत व्यवस्थापन केले जाते.