फारुख अब्दुल्ला तर्कहीन वक्तव्ये करतात : नक्वी 

पीटीआय
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

अल्पसंख्याक व्यवहारमंत्री नक्वी म्हणाले, की फारुक अब्दुल्लासाहेब ज्येष्ठ व्यक्ती आहेत. कधी कधी तर्कहीन वक्तव्ये करतात. "पीओके' पाकिस्तानचे आहे आणि भारत-पाकिस्तानने कितीही युद्धे लढली तरी हे बदलणार नाही, असे अब्दुल्ला काल म्हणाले होते. 
 
मुंबई(पीटीआय) : पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचा भाग (पीओके) पाकिस्तानचा असल्याच्या वक्तव्याबद्दल जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज टीका केली.

टॅग्स