सेक्‍स सीडी प्रकरण सीबीआयकडे देणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

छत्तीसगडचे मंत्री प्रेम पांडे यांनी हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून तापलेले वातावरण लक्षात घेता छत्तीसगड कॅबिनेटच्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रायपूर, ता. 29 (पीटीआय): छत्तीसगडचे मंत्री राजेश मुनात यांचे नाव सेक्‍स सीडीत नाव आल्यानंतर छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी भाजपवर विरोधकांकडून प्रखर टीका होत असल्याने छत्तीसगड सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्तीसगडचे मंत्री प्रेम पांडे यांनी हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून तापलेले वातावरण लक्षात घेता छत्तीसगड कॅबिनेटच्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेक्‍स सीडीमध्ये मंत्र्याचे नाव आल्याने कॉंग्रेसने टीका केली आहे. राजेश मुनात यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला जात आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल म्हणाले. 

टॅग्स