'ताजमहालाच्या जागी होते हिंदूंचे मंदिर'

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

ताजमहलात हिंदू देवदेवतांची अनेक प्रतिके आहेत. पुर्वी या ठिकाणी हिंदूंचे मंदिर होते. मात्र ते पाडून ही वास्तू उभारण्यात आली, ताजमहल हे जर फक्त एक समाधीस्थळ होते. तर त्याठिकाणी इतक्या खोल्या असण्याचे काय कारण? असेही यावेळी ते म्हणाले.

लखनऊ : ताजमहल असलेल्या जागेवर पूर्वी 'तेजोमहल' नावाचे हिंदूंचे मंदिर होते, त्यामुळे त्याचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार विनय कटियार यांनी केली आहे. 

ताजमहलात हिंदू देवदेवतांची अनेक प्रतिके आहेत. पुर्वी या ठिकाणी हिंदूंचे मंदिर होते. मात्र ते पाडून ही वास्तू उभारण्यात आली, ताजमहल हे जर फक्त एक समाधीस्थळ होते. तर त्याठिकाणी इतक्या खोल्या असण्याचे काय कारण? असेही यावेळी ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ताजमहलच्या वादात विनय कटियार यांच्या या वक्तव्याने अधिक भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या माहिती पुस्तिकेतून ताजमहलला वगळण्यात आले होते. त्यानंतर या वादाला सुरवात झाली होती. भारतीय कामगारांच्या घाम आणि मेहनतीने ताजमहल उभा राहिलेला आहे, त्यामुळे तो कुणी बांधुन घेतला ते महत्त्वाचे नाही असे म्हणत मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी या वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला होता. 

तसेच उत्तर प्रदेशचे भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहल हा देशद्रोह्यांनी बांधला असून तो भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचे म्हटले होते. भारताच्या इतिहासातून मुघलांना वगळण्यात यावे असेही ते म्हणाले. यावरून योगी अदित्यनाथ यांच्या सरकारवर टिकाही झाली होती. याची सारवासरव करण्यासाठीच मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ येत्या आठवड्यात ताजमहलला भेट देणार आहेत.