मंत्र्याच्या वाहनाच्या धडकेत बालकाचा मृत्यू 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमासाठी जात असेल्या मंत्री राजभर यांच्या ताफ्यातील वाहनाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या शिवा नाव्याच्या मुलाला धडक दिली.

लखनौ, ता. 29 (पीटीआय) ः उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्यामुळे आठ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज येथे शनिवारी हा अपघात झाला. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमासाठी जात असेल्या मंत्री राजभर यांच्या ताफ्यातील वाहनाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या शिवा नाव्याच्या मुलाला धडक दिली. यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी "रस्ता रोको' केले. तसेच मंत्री राजभर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. अपघातानंतर परिस्थिती चिघळल्यानंतर मंत्री राजभर यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत घातल्यानंतर "रस्ता रोको' मागे घेण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.