लँडिंग करताना समजला विमानाच्या चाकातील दोष; प्रवाशी सुखरूप!

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

जेट एअरवेजच्या डेहराडूनहून दिल्लीला पोहोचलेल्या एका विमानाचे पुढील चाक काम करत नसल्याचे लँडिंग करताना आढळून आले. त्यामुळे विमानाच्या लँडिंगला अडचण निर्माण झाली होती. मात्र विमानाचे लँडिंग करून विमानातील पाच कर्मचाऱ्यांसह सर्व 60 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या डेहराडूनहून दिल्लीला पोहोचलेल्या एका विमानाचे पुढील चाक काम करत नसल्याचे लँडिंग करताना आढळून आले. त्यामुळे विमानाच्या लँडिंगला अडचण निर्माण झाली होती. मात्र विमानाचे लँडिंग करून विमानातील पाच कर्मचाऱ्यांसह सर्व 60 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

जेट एअरवेजचे एटीआर 72-500 प्रकारातील 9W 2882 हे विमान गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्ड करत होते. मात्र विमानाचे समोरील चाक निष्क्रिय असल्याचे लक्षात आले. त्यावेळी विमानात पाच कर्मचारी आणि 60 प्रवाशी होते. चाक निष्क्रिय असल्याने लँडिंगला अडचण येत होती. त्यामुळे विमानावरील नियंत्रण सुटले. सुदैवाने विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला लॅण्ड झाले. त्यानंतर विमानातील सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे विमानातळावरील मुख्य धावपट्टी तब्बल दोन तास ब्लॉक करण्यात आली होती. या घटनेबद्दल नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालकांना कळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.