एका थपडेसाठी 100 जिहादींना ठार मारा- गौतम गंभीर

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना थप्पड मारणाऱयांचा बदला घेऊन एका थपडेसाठी 100 जिहादींना ठार मारा, अशा शब्दांत ट्विटरवर भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने राग व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना थप्पड मारणाऱयांचा बदला घेऊन एका थपडेसाठी 100 जिहादींना ठार मारा, अशा शब्दांत ट्विटरवर भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने राग व्यक्त केला आहे.

काश्‍मीरमध्ये पोटनिवडणूकीच्या बंदोबस्तावरून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान एव्हीएम घेऊन परतत होते. यावेळी स्थानिक फुटीरतावादी टोळक्‍याने जवानांशी गैरवर्तन करतानाच हाता-पायाने मारहाण केली होती. या टोळक्याच्या विरोधात नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत.

गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. जवानांबाबत झालेल्या कृत्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. गंभीर म्हणाला, 'माझ्या जवानांना थप्पड मारणाऱयांचा बदला घेऊन एका थपडेसाठी 100 जिहादींना ठार मारा.' गंभीरचे ट्विट अनेकांनी रि-ट्विट केले असून लाईकही केले आहे.

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सुद्धा ट्विटरवरून म्हटले आहे की, 'सीआरपीएफच्या जवानांबाबत असे करू शकत नाही. हे थांबले पाहिजे. बद्तमीझी की हद्द है'

Web Title: 'For every slap on jawan, kill 100 jihadis', says Gautam Gambhir