'त्या' विधानाबद्दल संघाच्या माजी प्रचार प्रमुखांना अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचे शीर कापून आणणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांना आज उज्जैन मधून अटक करण्यात आले आहे.

उज्जैन- केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचे शीर कापून आणणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांना आज उज्जैन मधून अटक करण्यात आले आहे.

केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या वाढत्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर निदर्शने करण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रावत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शीर कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर केले होते. तेव्हापासून चंद्रावत यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागितली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही एका पत्राद्वारे त्यांना सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केले होते. चंद्रावत यांना सोमवारी उज्जैन येथून अटक करण्यात आले आणि न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.