जगातला सर्वोत्तम अभियंता म्हणत वीज कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा Photo

Terrorist Osama Bin Laden
Terrorist Osama Bin Ladenesakal
Summary

नवाबगंजमधील विद्युत विभागाच्या कार्यालयातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

फारुखाबाद : नवाबगंजमधील विद्युत विभागाच्या (Electricity Department of Nawabganj) कार्यालयातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Terrorist Osama Bin Laden) आहे. या फोटोच्या माध्यमातून ओसामा बिन लादेनचं जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता (JE) असं वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

विशेष म्हणजे, एसडीओ नवाबगंज (SDO Nawabganj) यांच्याशी याबाबत बोललं असता, त्यांनी हा फोटो स्वत: कार्यालयात लावल्याचं मान्य केलंय. त्याचबरोबर कोणीही कोणालाही आदर्श मानू शकतो, असंही त्यांनी सांगितलंय. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यालयातून काढून टाकण्यात आलाय.

Terrorist Osama Bin Laden
Terrorist Osama Bin Laden
Terrorist Osama Bin Laden
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत : शिवराज सिंह चौहान

नवाबगंजमध्ये वीज विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या भिंतीवर कनिष्ठ अभियंता जुनेद आलम अन्सारी आणि अनिल कुमार गौतम यांच्यासह उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यांच्या फोटोला लागून ओसामा बिन लादेनचा फोटो लावण्यात आला होता. वेटिंग रूमच्या भिंतीवर दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो पाहून कार्यालयात गेलेले लोक आश्चर्यचकित झाले. दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या फोटोवर जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता, तसंच उपविभागीय अधिकाऱ्याचं नाव लिहिलं होतं.

Terrorist Osama Bin Laden
Heavy Rainfall : ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाचा कहर, भुस्खलनात 100 जणांचा बळी

एका व्यक्तीनं दहशतवादी ओसामा बिन लादेनचा भिंतीवरचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. व्हायरल झालेला फोटो आणि व्हिडिओ पाहून भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिश्रा मोनू यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांपासून विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी फोटो काढून टाकला. अधीक्षक अभियंता एस. के. श्रीवास्तव यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाचा नवाबगंजच्या कार्यकारी अभियंत्याकडून अहवाल मागवण्यात आलाय. या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक व मुख्य अभियंता यांना कारवाईसाठी पत्र पाठविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com