जयललितांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या प्रकृतीस्वास्थ्याबाबत अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी गुन्हे नोंदविले आहेत.

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या प्रकृतीस्वास्थ्याबाबत अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी गुन्हे नोंदविले आहेत.

सोशल मिडियावर जयललिता यांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या आणि फ्रान्समध्ये असलेल्या एका महिलेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित महिलेवर दंगलीला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मागील गुरुवारी जयललिता यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उलटी आणि ताप याशिवाय त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर असे काहीही नसून त्या लवकरच कामावर रूजू होणार आहेत. मात्र आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे. दरम्यान फ्रान्सस्थित महिलेसह अन्य तीन जणांवर अफवा पसविल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.