तुरुंगातील सेल्फीप्रकरणी शहाबुद्दीनवर गुन्हा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

सिवान: तुरुंगातून सेल्फी व्हायरल झाल्याप्रकरणी मंगळवारी माजी खासदार शहाबुद्दीन आणि अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने तक्रार दिली होती.

बिहारच्या सिवान तुरुंगात असलेला राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहंमद शहाबुद्दीन याच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शहाबुद्दीनचे तीन फोटो तुरुंगातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली होते. या प्रकरणी विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राज्याचे तुरुंग महानिरीक्षक आनंद किशोर यांच्या निर्देशानुसार चौकशी करण्यात आली.

त्यानुसार कारवाई करत शहाबुद्दीनवर गुन्हा दाखल करण्यात आला. सिवानमध्ये दोन भावांची ऍसिड टाकून हत्या केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शहाबुद्दीन सध्या सिवानच्या तुरुंगात कैद आहे. या प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने माजी खासदाराला जामीन मंजूर केला होता.