शशिकला, पलानीस्वामींविरुद्ध अपहरणाची तक्रार

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

चेन्नई : तमिळनाडूमधील राजकीय पेच आणखी वाढतच आहेत. शशिकला यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काल पलानीस्वामी यांना विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवडण्यात आले. मात्र, आमदारांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी पलानीस्वामी आणि शशिकला यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. 

दक्षिण मदुराईचे आमदार एस. सर्वानन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सर्वानन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझे अपहरण करून गोल्डन बे रिसॉर्टमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आले. कसेबसे मी तिथून पळून जाण्यात यशस्वी झालो आणि काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे पोचलो. 

पनीरसेल्वम यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकला यांनी आपल्या सर्व आमदारांना गोल्डन बे रिसॉर्ट येथे ठेवले होते. या आमदारांना जबरदस्तीने बंदी बनवून ठेवण्यात आले होते, असा आरोप विरोधक करीत आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर सर्वानन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
 
Web Title: fir against sasikala and palansami