शुभांगी स्वरुप नौदलाच्या पहिल्या पायलट

indian-navy
indian-navy

कन्नूर - भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेचा पायलट म्हणून समावेश करण्यात आला आहे. शुभांगी स्वरूप असे या महिला पायलटचे नाव आहे. स्वरूप त्यांच्याबरोबरच आस्था सहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांचाही नौदलाच्या अर्मामेंट इन्स्पेक्शन ब्रँचमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1991मध्ये नौदलाच्या इतर विभागांमध्ये महिलांचा समावेश करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 2015मध्ये महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. भारतीय महिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, यामुळे जास्तित जास्त महिला नौदलाचा करिअर म्हणून विचार करतील असेही लांबा म्हणाले. 

शुभांगी स्वरुप या बरेलीच्या रहिवासी आहेत. काल (बुधवार) नौदलाचा दीक्षांत सोहळा पार पडला त्यावेळी माझ्यासाठी हा रोमांचित करणारा क्षण असला तरी या पदाबरोबर मोठी जबाबदारी आपल्याला पार पाडावी लगणार आहे याची मला पूर्ण जाणिव असल्याची प्रतिक्रीया स्वरुप यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com