निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; पाच आमदार MDA मध्ये सामील

Congress MLA
Congress MLAesakal
Summary

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मेघालयातील पाचही काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) मंगळवारी मेघालय लोकशाही आघाडीत (MDA) सामील होण्याचा निर्णय घेतलाय. 2023 च्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मेघालयातील विरोधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात एमडीएचं युतीचं सरकार आहे.

एमडीएमध्ये सामील झालेल्या पाच काँग्रेस आमदारांमध्ये सीएलपी नेते अंपारीन लिंगदोह, मायरलबोर्न सिएम, मोहेंद्रो रापसांग, किम्फा मारबानियांग आणि पीटी सॉकमी यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच आमदारांची मंगळवारी बैठक झाली आणि त्यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा (CM Conrad Sangma) यांना स्वाक्षरी केलेलं पत्र सुपूर्द केलं. मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स (Meghalaya Democratic Alliance) ही राजकीय पक्षांची युती आहे. ज्यांनी 2003 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मेघालय राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर त्याचं नेतृत्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) करत आहे.

Congress MLA
'या' राज्यात भाजपला मोठा झटका; दोन आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Meghalaya Assembly Election) काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. परंतु, काँग्रेस आपलं सरकार स्थापन करू शकलं नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचा सहयोगी असलेल्या एनपीपीनं (NPP) एमडीएची स्थापना केली आणि काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. मेघालय हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मुकुल संगमा 2010 ते 2018 दरम्यान मुख्यमंत्री होते. परंतु, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुकुल संगमा यांना डावलून शिलाँगचे खासदार व्हिसेंट पाला (Vincent Pala) यांची मेघालय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसमधील अडचणीत वाढ झाली. TMC आता 60 सदस्यांच्या मेघालय विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.

Congress MLA
'पश्चिम बंगालप्रमाणं यूपीतही भाजपचा होणार खेला होबे'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com