नेपाळमधून पाणी सोडल्याने गोरखपूरमध्ये पूरस्थिती

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे वाटण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला असून शाळा व महाविद्यालयांनी सुटी देण्यात आली आ

गोरखपूर - नेपाळमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशमधील रापती व रोहिणी नद्यांना पूर आला आहे. शहरातील सखल भागात पुराचे पाणी पोचण्यास सुरवात झाली असून येथील रहिवाश्‍यांना सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी राजीव राऊतेला यांनी दिली.

पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे वाटण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला असून शाळा व महाविद्यालयांनी सुटी देण्यात आली आहे. शहरातील जफर कॉलनी, बहरामपूर, रसूलपूर, पिपरापूर आदी भागांत पाणी साठले आहे. गोरखपूरच्या पश्‍चिमेकडील रापती नदीवरील डोमिनगड धरणातून आज सकाळी सातच्या सुमारास पाणी वाहण्यास सुरवात झाल्यानंतर पूरस्थिती गंभीर बनली, असे राऊतेला यांनी सांगितले..