'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज 

food needs in Kerala Plumber, ready to eat
food needs in Kerala Plumber, ready to eat

तिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा मोठा तडाखा बसलेल्या केरळला काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. पूरग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे नागरिक आता त्यांच्या घरांकडे परतू लागले असून, मदत कार्यानेही आता वेग घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी आज दिली. वायरमन, प्लंबर आणि सुतारकाम करणाऱ्या कामगारांबरोबरच "रेडी टू इट' प्रकारातील शिजविलेल्या अन्नाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुरामुळे विस्तापित झालेल्या सुमारे दहा लाख नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली असून, त्यासाठी विविध कौशल्य असलेल्या कामगारांची केरळला आवश्‍यकता असल्याचेही अल्फोन्स यांनी स्पष्ट केले. 

एर्नाकुलम, अलाप्पुझातील परिस्थिती अद्यापही बिकट मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी होताना दिसत असले, तरी पुराचा मोठा फटका बसलेल्या एर्नाकुलम, त्रिसूर, अलाप्पुझा आणि कोल्लम जिल्ह्यातील अनेक भागांतील परिस्थिती अद्यापही बिकट आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खाली आलेली नाही, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. केरळमधील पुराचे संकट "गंभीर स्वरूपाची आपत्ती' असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी जाहीर केले आहे. 

आकडेवारी 
- नुकसान : 20,000 कोटी 
- पूरबळींची संख्या : 223 
- विस्तापितांची संख्या : 10.78 लाख 
- मदत छावण्या : 2,300 

आता पुन्हा उभे राहण्याचे आव्हान 
- केरळमध्ये 30 मेपासून पाऊस, पूर आणि दरडी कोसळल्यामुळे 373 बळी 
- पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी धावले प्राणिप्रेमी 
- ओनम, बकरी ईदच्या सणांचा उत्साह पुरामुळे मावळला 
- पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या रद्द 
- केरळी जनतेसाठी जगभरातून मदतीचा ओघ वाढला 
- केरळातील मागील अनेक दशकांतील सर्वांत भीषण पूर 
- राज्यात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला सुरवात 
- साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ 
- कोचीन बंदरामध्ये अनेक ठिकाणांहून मदत सामग्री दाखल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com