जंगलांत ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ हवाच

सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत
Court
CourtSakal

नवी दिल्ली - राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये यांच्यामध्ये ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ (ईएसझेड) असायलाच हवा. संरक्षित वनक्षेत्राच्या सीमेपासून किमान एक किलोमीटर अंतरावर त्याची निर्मिती केली जावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्या. एल. नागेश्वरराव, न्या. बी. आर. गवई आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने हे निर्देश देतानाच राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांच्या हद्दीमध्ये उत्खननाला परवानगी दिली जाऊ नये असेही म्हटले आहे. या ‘इको सेन्सेटिव्ह झोन’च्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्थायी बांधकामाला परवानगी दिली जाता कामा नये असेही न्यायालयाच्या आदेशांत नमूद करण्यात आले आहे. सध्या या झोनमध्ये अशाप्रकारची बांधकामे झाली असतील तर त्यांची एक यादी तयारी केली जावी आणि त्याचा अहवाल तीन महिन्यांच्या आत आम्हाला सादर करण्यात यावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

जगन्नाथ मंदिराजवळ बांधकामास हिरवा कंदील

पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या आवारामध्ये ओडिशा सरकारकडून केल्या जाणाऱ्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवितानाच त्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. जनहिताच्यादृष्टीने हे बांधकाम होणे गरजेचे असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले. न्या. बी. आर. गवई आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने याबाबतची जनहित याचिका फेटाळून लावली. या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात अशा स्थितीमध्ये त्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार जर काही सोयी-सुविधा उभारत असेल तर त्यांना त्यापासून रोखता येत नाही, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. या याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यात तथ्य नसल्याचे सांगत कोर्टाने ती फेटाळून लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com