भूतकाळ विसरून नवी सुरवात करा: शहाबाज शरीफ

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

लाहोर - सिंगापुरात झालेल्या अमेरिका - उत्तर कोरिया यांच्यातील ऐतिहासिक चर्चेतून बोध घेत भारत आणि पाकिस्ताननेही आता पुन्हा शांतता चर्चा सुरू करावी, असे वक्तव्य पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे (पीएमएल-एन) प्रमुख शहाबाज शरीफ यांनी आज केले. भूतकाळात जे झाले ते विसरून जात नव्याने सुरवात करण्याचा सल्लाही शहाबाज यांनी भारताला दिला आहे. 

सिंगापूरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात मंगळवारी झालेल्या शिखर परिषदेत सकारात्मक चर्चा झाली असून, या प्रयत्नांचे स्वागतच केले पाहिजे. यातून भारत आणि पाकिस्तानने बोध घेत काश्‍मीर प्रश्नी चर्चेला सुरवात करावी, असे शरीफ म्हणाले. पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांचे शहाबाज हे बंधू आहेत. 

भारत आणि पाकिस्तानने व्यापक शांतता चर्चा करण्याची वेळ आली आहे. काश्‍मीर प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू व्हायला हवी, असे शहाबाज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पीएमएल-एन पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या शहाबाज यांनी म्हटले आहे की, मागे काय झाले ते सोडून देत भारताने नव्याने सुरवात करण्याची गरज आहे. 

Web Title: Forget the past and start a new one says Shahbaz Sharif