'ओआरओपी'साठी माजी सैनिकाची दिल्लीत आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करत असलेल्या एका माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ओआरओपी योजनेप्रकरणी माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल हे समाधानी नव्हते. ते सोमवारपासून आपल्या काही सहकाऱ्यांसोबत जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. मंगळवारी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेण्यासाठी जात होते. पण, त्यापूर्वीच त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांना तात्काळ राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

रामकिशन यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते, की मी माझा देश, मातृभूमी आणि जवानांसाठी बलिदान देत आहे. रामकिशन यांच्या मुलाशी त्यांचे आत्महत्येपूर्वी बोलणे झाले होते. या प्रकऱणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत मोदींच्या राज्यात जवान आणि शेतकरी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.