अटलबिहारी वाजपेयी एम्स रूग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना आज (ता. 11) दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर नियमित उपचार ही सुरू आहेत.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना आज (ता. 11) दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर नियमित उपचार ही सुरू आहेत. आज त्यांना नियमित तपासणीसाठी एम्समध्ये दाखल केले असता, त्यांना अॅडमिट करून घेण्यात आले. 

वाजपेयी यांना डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावलेली आहे, यामुळे ते अंथरूणाला खिळून आहेत. 

Web Title: former prime minister atal bihari vajpeyi admitted in aiims hospital delhi