"सुपरकॉप' के पी एस गिल कालवश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मे 2017

खलिस्तानी दहशतवादाचे आव्हान समूळ नष्ट करणाऱ्या गिल यांना तत्कालीन माध्यमांनी "सुपरकॉप' अशी पदवी बहाल केली होती. गिल यांनी पंजाब राज्याचे पोलिस महासंचालक पद दोनदा भूषविले होते

नवी दिल्ली - पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादाचा नि:पात करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडलेल्या के पी एस गिल यांचे आज (शुक्रवार) दुपारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

खलिस्तानी दहशतवादाचे आव्हान समूळ नष्ट करणाऱ्या गिल यांना तत्कालीन माध्यमांनी "सुपरकॉप' अशी पदवी बहाल केली होती. गिल यांनी पंजाब राज्याचे पोलिस महासंचालक पद दोनदा भूषविले होते.

निवृत्तीनंतर गिल यांची नियुक्ती भारतीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. गिल यांना 1989 मध्ये पद्मश्रीनेही गौरविण्यात आले होते.