आता सचिन, रेखाऐवजी यांची होणार राज्यसभेवर नियुक्ती

Four candidate Nominated As Rajya Sabha Mps
Four candidate Nominated As Rajya Sabha Mps

नवी दिल्ली - राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, त्याचबरोबर सामजिक कार्यकर्त्या अनु गागा यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. आता त्यांच्या जागी नवीन चार खासदारांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांचा समावेश आहे.

सिनेसृष्टी आणि खेळ या क्षेत्रातून एकाही व्यक्तीला यावेळी संधी देण्यात आलेली नाही. गेल्या काळात अभिनेत्री रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीवरून बरीच चर्चा झाली होती. त्यामुळेच, सिनेसृष्टी आणि खेळ या क्षेत्रातून यावेळी कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडलेले चारही लोक हे  त्यांच्या क्षेत्रातील प्रतिभावंत आहेत. 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चौघांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते आहे. राम शकल यांनी समाजातील दलित आणि मागासवर्गीय घटकांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. राकेश सिन्हा भाजपाची विचारसरणी काय आहे हे ते विविध कार्यक्रमांमध्ये मांडत असतात. सोनल मानसिंग या क्लासिकल डान्सर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. तर, रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिरासंबंधी महत्त्वाचे कार्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com