काश्मीरमध्ये 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

टीम ई सकाळ
सोमवार, 10 एप्रिल 2017

या भागात आणखी पाकिस्तानी घुसखोर आहेत का याचा तपास घेण्यासाठी लष्कराने त्वरीत शोध मोहीम सुरू केली आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरांना भारतीय लष्कराने आज (सोमवार) सकाळी कंठस्नान घातले. 

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरान भागामध्ये लष्कराने ही घुसखोरी उघडकीस आणली. या भागात आणखी पाकिस्तानी घुसखोर आहेत का याचा तपास घेण्यासाठी लष्कराने त्वरीत शोध मोहीम सुरू केली आहे.

संरक्षण खात्याच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवाद्यांचा एक गट सीमेपलीकडून प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून केरान सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला. याबाबतचा अधिक तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.