भारताला मिळाले चार 'राफेल मंत्री' : राहुल गांधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नवी दिल्ली : राफेल प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 'चार वर्षांत चार संरक्षणमंत्री बदलल्यावरून' पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. संरक्षणमंत्री बदलल्यामुळेच पंतप्रधानांना राफेलवर पुन्हा वाटाघाटी करण्याची संधी मिळाल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदींवर हल्ला चढवला. 2014 पासून देशाला चार फिरते संरक्षणमंत्री मिळाले. आता यामागचे कारण उमगले आहे. यामुळे पंतप्रधानांना राफेलसंदर्भात फ्रान्ससोबत स्वतः फेरवाटाघाटी करण्याची मुभा मिळाली. भारताला चार 'राफेल मंत्री' मिळाले; परंतु फ्रान्ससोबत नेमके काय ठरले, याची पंतप्रधान मोदी वगळता कोणालाही माहिती नाही. पंतप्रधान यावर बोलणार नाहीत, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले. 

Web Title: Four Rafael Ministers of India : Rahul Gandhi