फसवणूक करणाऱ्यांच्या घरापुढे वाजणार ढोल

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पैसे वसूल करण्यासाठी "सेबी'चा निर्णय
नवी दिल्ली - गुंतवणूकदारांचे पैसे बुडविणारे, तसेच कर्जबुडव्यांना समन्स बजावताना त्यांच्या घरापुढे ढोल वाजविण्यासोबत ध्वनिक्षेपकावरून घोषणा करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक संस्थे(सेबी)ने घेतला आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस येत आहे. अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता जप्त करण्यास सरकारने "सेबी'ला परवानगी दिली आहे. "सेबी' फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून पैसे वसूल करण्यासाठी बाहेरील संस्थेची मदत घेणार आहे. ही संस्था समन्स बजावणे, घोषणा करणे आणि विक्रीची नोटीस बजावणे अशी कामे करेल. या संस्थांची नोंदणी पुनर्रचना कंपनी म्हणून करण्यात येईल. ही संस्था समन्स बजावताना फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर ढोल वाजवेल, तसेच ध्वनिक्षेपकावरून घोषणा करेल. याबाबतच्या सूचना "सेबी' संबंधित विभागांना करणार आहे.