मध्यप्रदेशात बलात्काराची भरपाई हडपणारी टोळी सक्रिय

धक्कादायक बाब म्हणजे खोट्या तक्रारी दाखल करून आतापर्यंत अनेकांचे आयुष्य या टोळीमुळे उद्धस्त झाले आहे.
Rape
RapeSakal

भोपाळ : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) नुकसान भरपाई मिळवण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करून मोठी रक्कम बळकवणारी टोळी सक्रीय असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये टोळीमध्ये बनावट तक्रारदारापासून ते पोलीस, वकिलांपर्यंत व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, ही भरपाई देण्यात येणाऱ्या घटनांमध्ये आर्थिक घोटाळा (Financial Help) होत असल्याचे मत ही मदत मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आहे. धक्कादायक बाब म्हणजे खोट्या तक्रारी दाखल करून आतापर्यंत अनेकांचे आयुष्य या टोळीमुळे उद्धस्त झाले आहे. या बातमीत आज आपण अशाच काही घटनांबद्दल जाणून घेणार आहोत. याबाबत भास्कर डॉटकॉमने वृत्त प्रकाशित केले आहे. (Fraud Rape Gang Active In Madhya Pradesh)

Rape
आई मित्राला सांगायची मुलीवर बलात्कार करायला, आठ वेळा अंडाशय...

ग्वाल्हेरमधील एका महिलेना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मी एका प्रसिद्ध शाळेत लेक्चरर होते. मला २ मुले आहेत. नवऱ्याचा व्यवसाय होता. वस्तूंच्या ऑर्डरबाबत एक महिला आपल्या पतीशी संपर्कात आली. त्यानंतर जवळीक वाढली आणि मग ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला. या प्रकरणी पहिला एफआयआर 30 जून 2021 रोजी भोपाळमधील निशातपुरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. यामध्ये जामीन मंजूर झाला. मात्र, त्यानंतर 10 ऑक्टोबर 2021 रोजी एमपी नगर पोलीस ठाण्यात दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला.

Rape
80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?

या सर्व घटनेत मी पोलिसांना विनवणी करून संबंधित महिलेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत होते. परंतु, पोलिसांनी याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे पोलीसही या टोळीसोबत सक्रीय असल्याचा आरोप महिलेने केला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने यापूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर 2021 रोजी दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा एफआयआर दाखल केला होता. याशिवायदेखील या महिलेने अशाच पद्धतीच्या अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात तिला विभागाकडून आर्थिक मदतदेखील करण्यात आली आहे.

Rape
लग्नाचे खोटे आश्वासन देत तरुणीकडून घेतले पाच लाख

घर, गाडी नोकरी सर्व काही गेले

दरम्यान, या खोट्या तक्रारीनंतर नुकसान भरपाई देण्यासाठी माझ्या नवऱ्याने स्वतःचे दुकान, दोन गाड्या विकल्या. एवढेच काय तर, पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने मलादेखील नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे सुखाने सुरू असलेला आमचा संसार क्षणार्धात उद्धस्त झाला. मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने गेल्या वर्षभरापासून ते शाळेत गेलेले नसल्याचेही या महिलेने सांगितले.

जबलपूरमध्येही टोळी सक्रीय

ग्वाल्हेरमधील घटनेत एका कुटुंबाचा संसार उद्धस्त करणाऱ्या या खोटी तक्रारदार महिला जबलपूरमध्येही सक्रीय असल्याचे समोर आले आहे. या महिलेने जबलपूर येथे पाच जणांविरोधात बलात्काराचा एफआयआर दाखल केला आहे. एका महिलेवर एकापेक्षा जास्त वेळा बलात्कार होऊ शकत नाही, असे कायद्यात कुठे लिहिले आहे का?, असा उलट सवाल महिलेने केला असल्याचे पीडित महिलांचे म्हणणे आहे.

Rape
रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

हप्त्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने आला प्रकार उघडकीस

नीमचमध्ये बंछरा समाजातील एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक मदतीसाठी त्याची केस पुढे पाठवली नाही. दरम्यान, तक्रारदार महिला नेहमीचीच तक्रारदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, संबंधित महिलेने पोलिसांना त्यांचा हप्ता देण्यास नकार दिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.

अशा प्रकारे काम टोळी करते

जबलपूरमध्ये बलात्काराच्या आरोप असलेल्या एका तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, तक्रार करणाऱ्या मुली सधन घरातील मुलांशी संपर्क साधतात. त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने त्याचा व्हिडिओ बनवतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरु करतात त्यानंतर बलात्काराचा एफआयआर दाखल करतात. घटनेत पीडित महिला दलित-आदिवासी असेल, तर आर्थिक मदतही दिली जाते. इतकंच नाही तर तिला कोर्टात होस्ट करण्याआधी सेटलमेंटच्या बदल्यात फायदेही मिळतात. यात काही मध्यस्थही सक्रिय आहेत. पीडितांना मिळणाऱ्या मदतीचा काही भागही त्यांना मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com