इंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी

इंधन दरवाढीचा आगडोंब ; देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी

नवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 90.22 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 78.69 रुपयांवर पोचला. 

देशातील सर्व महानगरांमध्ये आज पेट्रोलच्या आज प्रतिलिटर 14 पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 82.36 रुपये, चेन्नईमध्ये 86.13 रुपये आणि कोलकत्यात 84.68 रुपयांवर पोचला. डिझेलच्या दरात आज मुंबईत प्रतिलिटर 11 पैसे आणि दिल्लीसह इतर महानगरांमध्ये 10 पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर 74.12 रुपये, चेन्नईमध्ये 78.36 आणि कोलकत्यात 75.97 रुपयांवर गेला. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव मागील पाच आठवड्यांपासून वाढत असून, तो 71 डॉलरवरून 80 डॉलरवर गेला आहे. याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे 5 ते 6 टक्के अवमूल्यन झाले आहे. यामुळे खनिज तेलाच्या आयातीच खर्च वाढला असून, देशांतर्गत इंधनदरवाढ होत आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा खनिज तेल आयातदार देश आहे. 

करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये) 
पेट्रोल : 42.04 
डिझेल : 45.34 

इंधन दरवाढीची कारणे 

- जागतिक पातळीवर खनिज तेलाची भाववाढ 
- डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात महाग 
- केंद्र व राज्यांचा कराचा मोठा बोजा 

दर आणखी भडकणार 

सणासुदीमुळे देशभरात इंधनाची मागणी सध्या कमी होताना दिसत नाही. यापुढील काळात हे चित्र कायम राहील. यामुळे आगामी काळात इंधनदरात आणखी वाढ होईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com