महात्मा गांधींची समर्पित वृत्ती प्रेरणादायी: मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पना, गरीब आणि अन्यायग्रस्तांसाठी काम करण्यासाठीची समर्पित वृत्ती प्रेरणादायी असल्याचे म्हणत त्यांनी जगाला आणखी सुंदर बनविल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

महात्मा गांधी यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त राजघाट येथे त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मोदी बोलत होते. महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील समाधीस्थळी आज (रविवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. "महात्मा गांधी यांनी अहिंसा, अभिव्यक्ती, समानता, धार्मिक सहिष्णुता, परस्परांचा आदर ही शाश्‍वत मूल्ये आपणाला शिकवली आहेत', अशा भावना राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केल्या. गांधी जयंतीनिमित्त आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवानी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.