संघावर टीका केली नसती तर गौरी वाचल्या असत्या: भाजप आमदार

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गौरी लंकेश या आपल्या बहिणीसारख्या होत्या. परंतु, त्या नेहमी संघ आणि भाजपच्याविरोधात लिहीत होत्या. आतापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. स्वयंसेवकांच्या हत्येच्या विरोधात मात्र आवाज उठवला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारावर त्या संघाच्या विरोधात लिहीत होत्या.

बंगळूर : गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विरोधात गेल्या नसत्या तर त्या जिवंत राहिल्या असत्या, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील भाजप आमदार डी. एन. जीवराज यांनी केले आहे. जीवराज यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गौरी लंकेश या आपल्या बहिणीसारख्या होत्या. परंतु, त्या नेहमी संघ आणि भाजपच्याविरोधात लिहीत होत्या. आतापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. स्वयंसेवकांच्या हत्येच्या विरोधात मात्र आवाज उठवला नाही. चुकीच्या माहितीच्या आधारावर त्या संघाच्या विरोधात लिहीत होत्या. "चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार' या लेखात त्यांनी स्वयंसेवकांवर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांनी काही लिहिले नसते तर त्या जिवंत राहिल्या असत्या, असे जीवराज यांनी म्हटले आहे. 

जीवराज यांच्या या वक्तव्याची कॉंग्रेसने निषेध केला असून, जीवराज यांना यातून काय सुचवायचे आहे, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. श्रृंगेरी येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मात्र, आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप जीवराज यांनी केला आहे.