Buddha Jayanti 2022: गौतम बुद्धांच्या 'या' विचारांनी लोकांचं जीवन बदलून टाकलं

गौतम बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण दिली.
Buddha thoughts
Buddha thoughtsSakal

Buddha Jayanti 2022: आज वैशाख पौर्णिमा...इ.स. पूर्व 563 मध्ये याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्धपौर्णिमा असंही म्हटलं जातं. भगवान बुद्धांनी आपलं जीवन लोककल्याणासाठी खर्ची घातलं. ‘पाली’ या लोकभाषेतून त्यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग व पंचशीले सांगितली. (Gautama Buddha's thought changed people's lives.)

भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये-

  1. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे.

  2. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे त्याच्या दुःखाचे कारण आहे.

  3. दुःख निरोध :- सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने दुःखाचे निराकरण होते.

  4. प्रतिपद :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

Buddha thoughts
बुद्धांनी असं काय पाहिलं की राजेशाही, बायको-मुलगा अन् संपत्तीचा त्याग केला

भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये-

  • सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

  • सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

  • सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.

  • सम्यक कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

  • सम्यक आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

  • सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

  • सम्यक स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

  • सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

धम्माची तीन अंगे-

  1. शील: धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार.

  2. समाधी: शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला नियंत्रित करणे आवशक आहे. ह्यासाठी समाधी महत्त्वाची आहे.

  3. प्रज्ञा: सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणतीना कोणती संवेदना मिळू लागते. यास प्रज्ञा असे म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com