गिलगीट, बाल्टिस्तान भारताचेच

पीटीआय
सोमवार, 28 मे 2018

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगीट, बाल्टिस्तान भागांबाबत पाकिस्तान सरकारने दिलेल्या आदेशाबद्दल भारत सरकारने संताप व्यक्त केला. गिलगीट, बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्‍मीर भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे सरकारने ठणकावून सांगितले.  

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे भारतातील उपउच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना पाचारण करत त्यांची कानउघाडणी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी २१ मे रोजी एका आदेशान्वये स्थानिक प्रशासन मंडळाच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या. या आदेशान्वये सर्व निर्णय घेण्याचा सर्वाधिकार पाकिस्तान पंतप्रधानांना दिला. दरम्यान, सर्व पक्षांच्या नेत्यांनीही या बदलाला विरोध केला.

बदलामागील कारण
पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगीट, बाल्टिस्तान हे वेगळे भूभाग म्हणून आतापर्यंत पाकिस्तानने त्याकडे पाहिले होते. आता नव्या आदेशाचा वापर करून हा भाग पाकिस्तानचा प्रांत म्हणून जाहीर करण्यासाठी ही हालचाल असल्याचे मानले जात आहे. याच भागातून चीनचा महत्त्वाकांक्षी आर्थिक कॉरिडॉर जात आहे. त्यामुळे निश्‍चित दर्जा नसलेल्या या भागांबाबत चीनने दबाव आणल्यानेच पाकिस्तानने ही हालचाल केल्याचे मानले जात आहे.

Web Title: Gilgit Baltistan is Indias only one