मुख्याध्यापकासह 3 शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

जेहनाबाद (बिहार)- जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

उप-विभागीय पोलिस अधिकारी पी. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'पीडीत विद्यार्थिनी (वय 12) काल (रविवार) शाळेच्या इमारतीमध्ये आली होती. यावेळी काको हायस्कूलचे मुख्याध्यापक अजु अहमद, शिक्षक अतुल रेहमान, अब्दुल बारी व एम. डी. शाकौत यांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'सुटीच्या दिवशी शिक्षक मला शाळेत बोलून घेत असत. काल शाळेला सुटी असतानाही त्यांनी बोलावले. यावेळी मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामुहिक बलात्कार केला.'

Web Title: Girl Allegedly Gang-Raped By Principal, 3 Teachers In Bihar