फेसबुकवर झाली मैत्री, लग्नाचं दिलं वचन; हॉटेलमध्ये नेऊन तरूणीवर गँगरेप

लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर तिचा मित्र आणि अन्य एकाने सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
Gangrape
GangrapeSakal

Gang Rape in Jodhpur, Rajasthan: लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर तिचा मित्र आणि अन्य एकाने सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे घडली आहे. याबाबत मुलीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

एडीसीपी निशांत भारद्वाज यांनी सांगितले की, उदयमंदिर पोलिस स्टेशन परिसरातील २४ वर्षीय तरुणीची जयपूरच्या रवींद्र सिंहसोबत २५ नोव्हेंबर २०२१ रोजी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. रवींद्र सिंगने तरुणीला सांगितले की, लवकरच लग्न करण्याचं आश्वासन दिलं. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला रवींद्र सिंहने पीडित मुलीला राय का बाग भागातील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. यानंतर रवींद्र सिंगने तिचा गर्भपातही करून घेतला.

Gangrape
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

22 मे रोजी रवींद्र सिंह जोधपूरला पोहोचला आणि तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले. रवींद्रचा एक मित्रही तिथे होता. रवींद्र आणि त्याच्या मित्राने मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिला मारहाणही केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिली. यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलीची वैद्यकिय तपासणी केली आहे.

Gangrape
धक्कादायक! रेल्वे स्टेशनवर दिव्यांग अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

जोधपूर पोलीस (Police) आयुक्तालयाचे एडीसीपी निशांत भारद्वाज या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, पीडितेने तक्रार दाखल केली आहे. फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून तिची तरुणाशी मैत्री झाली होती. मैत्रीनंतर तो मुलगा जोधपूरला आला. लग्नाच्या बहाण्याने 'वन राई का बाग' हॉटेलमध्ये पीडितेवर बलात्कार केला. रॅडिसन हॉटेलमध्येही लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com