शांतता प्रस्थापित होण्यासाठी संधी द्या

पीटीआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मेहबूबा मुफ्तींचे काश्‍मिरी जनतेस आवाहन

श्रीनगर - जम्मू आणि काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी संधी द्या, असे आवाहन आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्‍मिरी जनतेस केले आहे. येथे शांतता प्रस्थापित झाल्यास भारत-पाकिस्तानमधील संबंधात आमूलाग्र बदल होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

मेहबूबा मुफ्तींचे काश्‍मिरी जनतेस आवाहन

श्रीनगर - जम्मू आणि काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी संधी द्या, असे आवाहन आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्‍मिरी जनतेस केले आहे. येथे शांतता प्रस्थापित झाल्यास भारत-पाकिस्तानमधील संबंधात आमूलाग्र बदल होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पुलवामा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महिला महाविद्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. मेहबूबा म्हणाल्या, ""काश्‍मीरच्या विकासासाठी शांतता प्रस्थापित होणे महत्त्वाचे असून, जनतेने तशी संधी द्यावी. शांतता प्रस्थापित झाल्यास भारत-पाकमधील संबंधात सुधारणा होतील; तसेच चर्चेसाठी पोषक वातावरण तयार होईल.''

आपले सरकार विकास व चर्चा या दोन बाबींला प्राधान्य देऊन काम करेल. सरकारने विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक योजना तयार केल्या असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्भवलेल्या स्थितीमुळे समाजातील सर्व घटकांना हानी पोचली असून, येथील शांतता कायम राखणे ही जनतेची मोठी जबाबदारी आहे, असेही मुफ्ती यांनी नमूद केले.

महिलांमध्ये समाज बदलण्याची क्षमता असून, त्यांनी शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित करावे. समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान असून, त्यांचे सक्षमीकरण झाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
- मेहबूबा मुफ्ती, मुख्यमंत्री जम्मू आणि काश्‍मीर

देश

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर प्रकरणावरून आज (शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर...

01.42 PM