सन्मानपुर्वक जागा मिळाल्यातरच एकजूट - मायावती

वृत्तसंस्था
रविवार, 27 मे 2018

पुढील 20 वर्ष पक्षाची प्रमुख मीच राहणार
पुढील 20 ते 22 वर्षापर्यंत पक्षाची प्रमुख म्हणून मीच सक्रीय काम करणार आहे. पक्षात होणारे बदल, दिशा ठरविण्यात येणार आहेत. त्यामुळे 20 ते 22 वर्ष कुणीही पक्षाचा प्रमुख किंवा माझा उत्तराधिकारी होण्याची स्वप्न पाहू नये. असे स्पष्ट संकेत अधिवेशात बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मायावती यांनी दिले.  

लखनऊ : 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट आजूनही संभ्रमातच आहे. त्यामध्ये बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सन्मानपुर्वक जागा मिळणार असतील तरच आघाडीसाठी हाथ पुढे करू असे स्पष्ट केले. लखनऊ येथे झालेल्या बहूजन समाज पक्षाच्या (बसपा) अधिवेशनात मायावती बोलत होत्या. 

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर (सपा) युती करण्यास घाई करण्याची गरज नाही. आपली पक्ष संघटना मजबूत करून लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा बीएसपीचा प्रयत्न असणार आहे. गोरखपुर आणि फूलपुर मध्ये समाजवादी पक्षाला समर्थन देणाऱ्या बसपाने कैराना मधील पोटनिवडणूकीत सपा पासून अंतर ठेवले आहे. 
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथ ग्रहन सोहळ्याला मायवतींनी हजेरी लावली होती. यावेळी विरोधी पक्षांची एकजूट होण्याचे संकेत मिळाले. परंतु, निवडणूकीत पक्षाला किती जागा मिळतात यावर ही एकजूट अवलंबून आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभच्या निवडणूकीत बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. आणि विधानसभेत 403 पैकी केवळ 19 जागांवर मायावतींच्या पक्षाला समाधान मानावे लागले होते. 

पुढील 20 वर्ष पक्षाची प्रमुख मीच राहणार
पुढील 20 ते 22 वर्षापर्यंत पक्षाची प्रमुख म्हणून मीच सक्रीय काम करणार आहे. पक्षात होणारे बदल, दिशा ठरविण्यात येणार आहेत. त्यामुळे 20 ते 22 वर्ष कुणीही पक्षाचा प्रमुख किंवा माझा उत्तराधिकारी होण्याची स्वप्न पाहू नये. असे स्पष्ट संकेत अधिवेशात बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मायावती यांनी दिले.  

Web Title: giving honorable seats in election