गोव्यात काँग्रेस न्यायालयीन लढ्याच्या मार्गावर

Goa
Goa

पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल अखिल भारतीय कॉंग्रेस मुख्यालयात अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय घडामोडींची माहिती दिली. सरकारकडे विधानसभेत सिद्ध करण्याजोगे बहुमत नसल्याने सरकार घालवण्यासाठी राज्यपाल विधानसभेचे अधिवेशन बोलावत नसतील तर न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग तपासून पहा अशी सूचना गांधी यांनी चोडणकर यांना केली आहे.

पणजीत भ्रष्टाचारविरोधी काढलेली फेरी, जाहीर सभा आणि त्याला मिळालेला मोठा प्रसिसाद याची माहिती गांधी यांच्यापर्यंत प्रसार माध्यमातून पोचली होती. तो विषय़ही चर्चेत आला. लोकांचे प्रश्न हाती घेत कॉंग्रेसने सातत्याने रस्त्यावर उतरत राहिले पाहिजे. सरकार सातत्याने दबावाखाली ठेवले पाहिजे. जनतेने भाजपला सत्ता दिली नव्हती, ती त्यांनी चोरली, ती परत मिळविण्यासाठी शक्य ते सारे मार्ग अवलंबा असा सल्लाही गांधी या्ंनी या भेटीदरम्यान दिला आहे.

याबाबत चोडणकर यांना विचारले असता ते म्हणाले, लोकसभेपू्र्वी गोव्यात कॉंग्रेसचे सरकार आले पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप गोव्यातील दोन्ही जागा गमावणार आहे. जनमत सरकारविरोधी आहे. आता नव्याने निवडणुका घेतल्या तर भाजपचे किती आमदार निवडणून येतील हे भाजपचे नेतेही सांगू शकणार नाहीत. या साऱ्या परिस्थितीची कल्पना गांधी यांना दिली आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरून गोव्यातील राजकीय लढ्याला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही राज्यात सरकारविरोधात मोहिम सुरु केली आङे. तीची व्याप्ती वाढवली जाईल. दक्षिण गोव्यातही आम्ही जनतेला सोबत घेऊन सरकारला जाब विचारणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com