किमान दोन तरी मुलं जन्माला घालण्याचा गोवा राज्यपालांचा विद्यार्थ्यांना सल्ला 

 goa governor advises students to have more than one child
goa governor advises students to have more than one child

बेळगांव - एकीकडे सरकार कुटुंब नियोजनासाठी देशव्यापी कार्यक्रम राबवत असताना गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी किमान दोन तरी मुले जन्माला घालण्याचा अजब सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. केएलई अॅकॅडमीच्या दिक्षांत सोहळ्यात राज्यपाल सिन्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या, त्यावेळी त्यांनी असे सांगितले.

घरात दोन मुले असतील तर लहानपणापासूनच त्यांना दोघांमध्ये वस्तू वाटून घेण्याची समज येते. ते आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, आजच्या तरुण पिढीमध्ये संस्कार नाहीत. त्यांच्या मनात मोठ्यांबद्दल आदर नाही, असं वयोवृद्ध सांगत असतात. परंतु, आपला याबाबतचा अनुभव वेगळा आहे. तरुण हे अधिक जबाबदार आहेत, असेही त्या म्हणाल्या.

शिक्षण म्हणजे फक्त साक्षर होणे किंवा पदवी मिळवणे एवढेच नाही तर ही एक खुप मोठी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतून गेल्यावर व्यक्तीच्या विचारांची पातळी वाढते असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com