गोव्यात दीड टन हापूस आंबा जप्त 

यूएनआय
शनिवार, 20 मे 2017

पणजी : दक्षिण गोव्यातील मार्गोवा येथील फळ विक्रेत्याकडून कृत्रिमरीत्या पिकविलेला दीड टन हापूस आंबा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

हबीब नारंगी या विक्रेत्याच्या गोदामावर छापा मारून कृत्रिमरीत्या पिकविलेला दीड टन हापूस आंबा जप्त करण्यात आला. इथॉपॉनचा वापर करून हे आंबे पिकविण्यात आले होते. या आंब्यांची प्रयोगशाळेत चाणी केल्यानंतर आंबा पिकविण्यासाठी रसायनाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेला आंबा नंतर मार्गोवा येथील कचरा प्रकल्पात नष्ट करण्यात आले. 

Web Title: Goa Mango seized