गोव्याला ज्ञानाच्या क्रांतीची गरज: मनोहर पर्रीकर

अवित बगळे
सोमवार, 18 जून 2018

पणजी - डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगावात गोव्याच्या क्रांतीची ज्योत पटवली तरी ती क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. गोमंतकीय समाजाचे रुपांतर ज्ञानाधिष्टीत समाजात करण्याच्या क्रांतीची आज गरज आहे, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पणजीत काढले. गोवा क्रांतीदिनाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. 

राज्यपाल डॉ. मुदुला सिन्हा व मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे वाहिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणले, 72 वर्षांपूर्वी क्रांतीची मशाल पटवली, स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा त्याग केला. त्यामुळे आज हे दिवस सगळ्यांना पहावयास मिळाले. मात्र हा लढा पूर्ण झालेला नाही. स्थलांतरीतांची मालमत्ता असललेल्या मये गावाचा प्रश्न सुटलेला नाही, तो साडविण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करेन. प्लास्टीकमुक्त गोवा मोहिमही नेटाने चालविण्यात येईल.

ते म्हणाले, प्लास्टीकचा वापर दैनंदिन जीवनात वाढला आहे. हे करतानाच प्लास्टीक रस्त्याच्या कडेला, प्लास्टीकचा कचरा मांडवी नदीत फेकताना मी अनेकांना पाहतो. मोटारीतून, दुचाकीवर लोक येतात व मांडवीत कचरा फेकतात. शिक्षित अशा लोकांकडून अशी अपेक्षा नाही. मात्र शिक्षण केवळ माहिती देते ज्ञानासाठी आणखीन पुढे जावे लागते. अशा ज्ञानाधारीत समाजाची निर्मितीच्या क्रांतीची ज्योत पेटविण्याची गरज आहे. ज्ञानाधिष्टीत, सुदृढ गोव्याच्या निर्मितीचे लक्ष्य आहे.

राज्यपाल म्हणाल्या, घऱाघरात आपल्या पूर्वजांनी काय उत्तम, उदात्त केले याच्या कहाण्या सांगितल्या जातात. तशा या क्रांतिकारकांच्या कहाण्या नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्या समावेश पाठ्यपुस्तकांत तर केला पाहिजे शिवाय घराघरात त्या सांगितल्या पाहिजेत. सुंदर, स्वच्छ व सुदृढ गोव्याच्या निर्मितीसाठी असे करणे आवश्यक आहे.

Web Title: Goa needs knowledge revolution: Manohar Parrikar