'त्या' शिवाय 'पद्मावती' गोव्यात प्रदर्शित करू नका

padmavati
padmavati

पणजी (गोवा): गोव्यात आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास (इफ्फी) सुरवात झाली असतानाच ‘पद्मावती’ या बहुचर्चित चित्रपटाकडे गोव्यातील राजस्थानी समाजाने‌ गोवा सरकारचे लक्ष वेधले आहे.

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती आगामी हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यापूर्वी वादात सापडलेल्या अनेक चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता, आदर्श महापुरूष-वीरांगणा यांचा अपमान, तसेच हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे आतापर्यंत आलेल्या ट्रेलरद्वारे दिसून आल्याचे राजस्थानी समाजाचे म्हणणे आहे. असे करून भन्साळी यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळल्याशिवाय चित्रपट गोव्यात प्रदर्शित करू नये, अशी मागणी राजस्थान राजपूत समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आज माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालक  टी.एस्. सावंत भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

या वेळी शिष्टमंडळामध्ये राजस्थान राजपूत समाजाचे वीरसिंग, मनोहर सिंग, शंभू सिंग, मनोराज सिंग, अजित चौधरी, हिंदु धर्माभिमानी राकेश तेंडुलकर, हिंदु जनजागृती समितीचे जयेश थळी आणि सत्यविजय नाईक यांचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे की, प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन स्त्रिया या समाजापुढे नाचगाणे करत नसत, तर त्या प्रसंगी हातात समशेर घेऊन शत्रूंना नाचायला लावणार्‍या वीरांगणा होत्या. असा जाज्वल्य आणि पराक्रमाचा थोर इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात महाराणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. हा राणी पद्मावती यांचा घोर अपमान आहे. यामुळे राजपूत समाजासह संपूर्ण हिंदु समाजाच्या भावना तीव्र आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कला स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे चित्रपट निर्मात्याला इतिहासात हस्तक्षेप करण्याची मुभा देत नाही. असे केल्यास या घटनादत्त अधिकारांचा गैरवापर आणि भारतीय दंडसंहितेचे कलम २९५ अ नुसार दंडनीय गुन्हा आहे. कलेच्या स्वातंत्र्याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व इतिहासालाही आहे. तितकेच महत्त्व मनावर कोरलेल्या प्रतिमेला, श्रद्धेला, आदराला आहे, हे भन्साळी आणि कला स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्या रात्री पद्मावतीने स्वत:च्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ (जीवंतपणी अग्नित प्रवेश) केला, अशा सत्शील राणीला सर्वांसमोर नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com