गोवा राज्य सहकारी बँकेवर त्रिसदस्यीय समिती प्रशासकाची नेमणूक 

विलास महाडिक
रविवार, 24 सप्टेंबर 2017

गोवा राज्य सहकारी बँकेची आज 24 सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

पणजी - गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने तसेच बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने सरकारने बँकेवर त्रिसदस्यीय समिती प्रशासकाची नेमणूक केली आहे. ही समिती सहा महिन्यासाठी असून उद्या 25 सप्टेंबरला संचालक मंडळाकडून ताबा घेणार आहे. 

या बँकेवर नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समिती प्रशासकामध्ये दोन चार्टर्ड अकाऊंटंट यू. बी. प्रभू वेर्लेकर व शैलेश उसगावकर तसेच बँक अर्थतज्ज्ञ मोहनदास रामदास यांचा समाेश आहे. या समितीचे अध्यक्ष वेर्लेकर तर इतर दोघे सदस्य आहेत. 

गोवा राज्य सहकारी बँकेची आज 24 सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेला भागधारकांची उपस्थिती कमी होती. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश लोटलीकर यांनी 2016-2017 सालचा बँकेचा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालानुसार बँकेला सुमारे 15 कोटी रुपये तोटा झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

Web Title: goa news goa state cooperative bank admin