पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पर्रीकरांचा अर्ज दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

या मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नसल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यावर पक्षाचे नेते विचार करीत आहेत.

पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघाच्या 23 ऑगस्टला होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (बुधवार) सकाळी मोठे शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक अधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांच्याकडे अर्ज सादर केला. 

या मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नसल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यावर पक्षाचे नेते विचार करीत आहेत. यापूर्वी काँग्रेसने माजी आमदार आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. मात्र, त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करून कॉंग्रेसला धक्का दिला.

गोवा फॉरवर्डने पर्रीकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. मगो पक्षानेही पर्रीकरांना समर्थन दिले आहे. पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांनाही काँग्रेसने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनीही नकार दिला आहे. प्रसिध्द वकील सुरेंद्र देसाई यांनाही काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली होती. परंतु त्यांनीही आपण इच्छुक नसल्याचे कळविले आहे. सध्या विरोधी पक्षांकडे पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार नसल्याने सर्व विरोधकांनी मिळून एकच उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

देश

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM