गोव्यात NH 66 वरील वाहतूक पुन्हा सुरळीत

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

जुन्या पुलावर झालेला अपघात आणि नव्या पुलाच्या पणजीकडील बाजूचे खड्डे...

पणजी (गोवा) : मांडवी नदीवरील दुसरा पूल आता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक सुरळीत झाली आहे. जुन्या पुलावर झालेला अपघात आणि नव्या पुलाच्या पणजीकडील बाजूचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळचे तीन तास ही कोंडी कायम होती. आता वाहतूक सुरळीत झाली आहे. मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे काम सुरु आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी हा सहा पदरी पूल खुला करण्यासाठी त्याचे काम वेगाने सुरु आहे. हा पूल झाल्यानंतर वाहतुकीचा प्रश्र्न सुटणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :