गोव्यामध्ये NH 66 वर वाहतूक कोंडी

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मांडवी नदीवर सध्या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.

पणजी (गोवा) : गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दोन पुलांपैकी एक पूल रात्रीपासून वाहतुकीस बंद आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वाहनांची मोठी रांग लागली आहे. मांडवी नदीच्या अलीकडे असलेल्या पर्वरीतून पूल पार करून पणजीत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागत आहेत.

पर्वरी ते पणजी हे अंतर केवळ तीन किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वापर पणजीत जाण्यासाठी करावा लागतो. सरकारी आकडेवारीनुसार सकाळी पणजीत तासाला ३० हजार वाहने दाखल होतात. याशिवाय परराज्यात जाणारी राष्ट्रीय महामार्ग वापरत असलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता किती मोठ्या प्रमाणावर वाहने सध्या एका पुलावरून जा ये करत आहेत याची कल्पना येते.

मांडवी नदीवर सध्या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. केबलवर ताणलेला उन्नत अशा प्रकारचा हा पूल आहे. त्यांच्या बांधकामासाठी जुना पूल रात्रीपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. गेले काही दिवस तो पूल रात्रीपासून बंद असतो मात्र सकाळी वाहतुकीस खुला केला जात असे. आज मात्र तो बंदच ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी पर्वरीच्या बाजूने झाली आहे. वाहनांची रांग दोन किलोमीटरवर पोचली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :